पुणे : विमानतळावर शिलाई मशिन-इस्त्रीतून 97 लाखांचं सोनं जप्त

21 Dec 2017 09:15 AM

पुणे विमानतळावर शिलाई मशिन आणि इस्त्रीमध्ये सोनं घेऊन जाणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. कारवाईत 97 लाख रुपये किमतीचे 4 किलोपेक्षा अधिक वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. सैफुला नासर दुडगावे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जेट एअरवेजच्या अबु धाबी विमानातून पुणे विमानतळावर उतरलेल्या इसमाचा संशय आल्याने त्याची झडती घेण्यात आली. त्याच्या बॅगेतील इस्त्री आणि शिलाईमशिनमध्ये सोनं लपवून ठेवलेलं आढळलं.

LATEST VIDEOS

LiveTV