खेळ माझा : पुणे : संत सोपानकाका बँकेला कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद

13 Nov 2017 11:51 PM

क्रीडा भारती व सहकार भारती यांच्या वतीनं आयोजित आंतर सहकारी बँक  करंडक कबड्डी स्पर्धेत संत सोपानकाका बँक ब संघानं विजेतेपद पटकावलं. पुण्यात आयोजित या स्पर्धेच्या अंतिम लढतीत संत सोपानकाका बँकेने विद्या सहकारी बँकेवर २४-१६ अशी आठ गुणांनी मात केली. संत सोपानकाका बँकेकडून अक्षय शिंदेने अष्टपैलू खेळ केला. अक्षय शिंदेलाच स्पर्धेतल्या सर्वोत्तम खेळाडूचा मान देण्यात आला. जनसेवा सहकारी बँकेच्या सागर पवारनं उत्कृष्ट चढाईपटूचं, तर विद्या सहकारी बँकेच्या राजेंद्र पवारनं उत्कृष्ट पकडींसाठीचं पारितोषिक मिळवलं.

LATEST VIDEOS

LiveTV