पुणे : डीएसकेंविरोधात हजारो गुंतवणूकदारांची पैसे थकवल्याची तक्रार

01 Nov 2017 02:15 PM

डी एस कुलकर्णींविरोधात तक्रार करण्यासाठी हजारो गुंतवणूकदारांनी पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये गर्दी केली. गुंतवणूकदारांची मोठी संख्या पाहुन आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत टेबल आणि खुर्च्या टाकून तक्रारी नोंद करुन घेण्यात आल्या. डी एस केंकडे विविध योजनांमधे पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या तेहतीस हजारांहुन अधिक आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
गुंतवणुकदारांमध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या काही दिवसांपासून आपले पैसै परत मिळावेत. यासाठी गुंतवणुकदार डीएसकेंच्या कार्यालयाला खेटे मारत आहेत. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. यापूर्वी म्हणजे 28 ओक्टोबरला डी एस केंविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

LATEST VIDEOS

LiveTV