पुणे : कॉग्निझंट आयटी कंपनीतून शेकडो कर्मचाऱ्यांची कपात

08 Dec 2017 11:18 PM

पुण्यातील कॉग्निझंट कंपनीने शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी नोकरीवरुन काढून टाकण्याच्या नोटीसा पाठवल्या आहेत.

कर्मचाऱ्यांचा विरोध थंड करण्यासाठी कंपनीनं पुढच्या चार महिन्यांसाठी कर्मचाऱ्यांना कंत्राटावर कामावर ठेवलं आहे. मात्र हे प्रकरण न्यायालयात असल्यानं कर्मचाऱ्यांनी काही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्तालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

ही परिस्थिती केवळ एकाच कंपनीपूर्ती नसून पुण्यात सध्या एकामागोमाग एक आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांना अशा नोटीसा पाठवत असल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV