UNCUT : महाराष्ट्र केसरी 2017 : अभिजीत कटकेच्या प्रशिक्षकांशी दिलखुलास गप्पा

25 Dec 2017 10:12 AM

महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. भूगावच्या कुस्ती आखाड्यात मॅटवर अभिजीतने सातारच्या मोही गावच्या किरण भगतला धूळ चारत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.

या लढतीत अभिजीतने किरणवर 10-7 अशी मात केली. अभिजीतच्या विजयानंतर भूगावच्या मामासाहेब क्रीडानगरीत प्रेक्षकांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला.

LATEST VIDEOS

LiveTV