महाराष्ट्र केसरी पुणे: काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील पैलवानांची तयारी

21 Dec 2017 05:21 PM

पुण्यातल्या मुळशी तालुक्यातल्या भूगावमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. या महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढाईसाठी अर्जुनवीर काका पवार यांच्या कात्रजमधल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातले एकदोन नाही, तब्बल बारा पैलवान  सज्ज झाले आहेत. विविध वजनी गटांमध्ये मिळून या संकुलाच्या ५३ पैलवानांनी शड्डू ठोकला आहे. कात्रजच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला भेट देऊन संकुलाची वैशिष्ट्यं आणि तिथल्या पैलवानांची तयारी जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी.

LATEST VIDEOS

LiveTV