मुंबई-पुणे प्रवास 20 मिनिटांत शक्य, लवकरच हायपरलूप तंत्रज्ञान येणार

16 Nov 2017 11:03 PM

मुंबई-पुणे प्रवास आता अवघ्या 20 मिनिटांत पार करणं शक्य होणार आहे. वाहतुकीसाठी हायपर लूप तंत्रज्ञान आणलं जाणार आहे. हायपर लूप वन आणि राज्य सरकारमध्ये यासंदर्भात करार झाला आहे.

सध्या मुंबई-पुणे रस्ते वाहतूक कायम अडथळ्यांची ठरते आहे. कधी वाहतूक कोंडी, तर कधी दरड कोसळल्याने वाहतुकीत अडथळा. नाना कारणांनी मुंबई-पुणे प्रवास त्रास देणारा ठरतो. त्यामुळे हायपरलूपसारखे पर्याय नक्कीच दिलासादायक ठरतील. मात्र अशाप्रकारची अद्यायावत सुविधा प्रत्यक्षात साकारायला कधी मुहूर्त मिळेल, हा प्रश्नच आहे.

LATEST VIDEOS

LiveTV