पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला अद्याप मान्यता नाही, मॅरेथॉन होणारच, संयोजकांचा दावा

02 Dec 2017 10:12 PM


पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला भारतीय अॅथलेटिक्स महासंघाची मंजुरी अजूनही मिळालेली नसली तरीही या शर्यतीचं आयोजन करण्यावर संयोजक मात्र ठाम आहेत. या शर्यतीचे संयोजन प्रल्हाद सावंत यांनी उद्याची मॅरेथॉन सुरळीतपणे पार पडेल असा विश्वास एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला. पुणे मॅरेथॉनचा वाद हा फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित असल्याचा दावा सावंत यांनी केलाय. उद्या सकाळी 5.30 वाजता सणस बागेपासून या मॅरेथॉनला सुरुवात होईल. तसंच पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती त्यांनी दिलीय.

LATEST VIDEOS

LiveTV