पुणे: ATM कार्ड क्लोनिंग करुन चोरी, तिघांना अटक

22 Dec 2017 10:21 AM

पुण्यातल्या पाषाण परिसरातल्या पंजाब नॅशनल बँकेतून खातेधारकांच्या खात्यातून अनधिकृतरित्या पैसे काढून नेणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय...हे तीनही आरोपी रोमानिया देशातले आहेत... बालन क्रिस्टल,लेझर क्रिस्ट,इरिमा आयोन्ट अशी तीन आरोपींची नावं आहेत... आरोपींनी मुंबई आणि वसई येथून अनेक खातेधारकांचे पैसे काढल्याचं समोर आलंय. विविध बँकांचे कार्ड क्लोनिंग करून एटीएम सेंटरमधून या तिघांनी रक्कम काढल्याचं कळतंय... पोलिसांनी त्यांच्याकडून क्लोन,५४ एटीएम कार्ड, एक स्कीमर, दोन लॅपटॉप, तीन मोबाईलसह अडीच लाख रुपये रोख रक्कम जप्त केलीय..

LATEST VIDEOS

LiveTV