पुणे : जुगार खेळणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला अटक

09 Dec 2017 08:33 PM

पुण्याच्या मुंढवा भागात शुक्रवारी रात्री एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून 41 जणांना ताब्यात घेण्यात आलं. धक्कादायक म्हणजे यामध्ये बारामतीच्या पोलिस निरीक्षकालाच रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजय जाधवला अटक करण्यात आली. कपिला मॅट्रिक्स या इमारतीत रमी आणि मनोरंजनाचे खेळ खेळण्यासाठी परवाना घेऊन क्लब चालवला जातो. मात्र या क्लबच्या नावाखाली सुरु असलेल्या जुगाराचाही पर्दाफाश झाला.

LATEST VIDEOS

LiveTV