पुणे: डी एस कुलकर्णींच्या मदतीला राज ठाकरे

24 Nov 2017 03:46 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींच्या बाजूने उभे राहिले आहेत. डीएसकेंकडे पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांपैकी काही गुंतवणूकदारांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली.

या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी डीएसकेंवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन गुंतवणूकदारांना केलं.

डीएसके आर्थिक अडचणीत सापडले आहेत, मात्र ते फसवणूक करणाऱ्यांपैकी नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले. मराठी व्यवसायिकांना संपवण्यासाठी एक लॉबी कार्यरत असून काही राजकारणीही त्यामध्ये सामील असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

LATEST VIDEOS

LiveTV