पुणे : गुंतवणूकदारांच्या फसवणाऱ्या डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

09 Nov 2017 10:30 AM

आर्थिक दिवाळखोरीत अडकलेले पुण्याचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यामुळे डीएसकेंना हा मोठा धक्का बसला आहे.

न्यायलयाच्या या निर्णयानंतर पोलीस डीएसकेंना अटक करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मंगळवारपर्यंत डीएसकेंच्या अटकपू्र्व जामीनावर दोन्ही बाजूनं युक्तीवाद सुरु होता. त्यामुळे आज अगदी पाच मिनिटांच्या आत या जामीन अर्जावर निर्णय देण्यात आला. डीएसकेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानं आता पोलिस काय कारवाई करतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, पुणे, मुंबई, कोल्हापुरातील अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्याने डीएसके अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात हजारो गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदवल्या आहेत.

LiveTV