पुणे : पु.ल देशपांडेंच्या घरात चोर घुसले, पुस्तकंच पुस्तकं पाहून पळाले!

19 Dec 2017 02:27 PM

साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यातील घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडारकर रोडवर पुलंचं राहतं घर आहे. घर बंद असताना सोमवारी पहाटे चोरांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटांचेही कुलूप तोडले. पुलंची हस्तलिखितं आणि पुस्तकं चोरांनी अस्ताव्यस्त केली. त्यापलिकडे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे तिथून त्यांनी पळ काढला.

LATEST VIDEOS

LiveTV