पुणे : डिसेंबरमध्ये रंगणार सवाई गंधर्व महोत्सव, जीएसटीमुळे तिकीटदर वाढले

15 Nov 2017 10:24 PM

यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 13 ते 17 डिसेंबर दरम्यान पुण्याच्या रमणबाग प्रशालेत रंगणार आहे. सवाई गंधर्व महोत्सवाचं यंदाचं हे 65 व वर्षं आहे. यंदाच्या महोत्सवात 28 कलाकार आपली कला सादर करणार आहेत. 13 डिसेंबरला मधुकर धुमाळ यांच्या सनई वादनाने महोत्सवाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, जीएसटीमुळं सवाई गंधर्व महोत्सवाच्या तिकीटांमध्ये मोटी वाढ करण्यात आलीय. गेल्या भारतीय बैठकीचं तिकीट साडे तीनशे रुपये होतं ते यंदा पाचशे रुपये झालंय. तर पुढच्या रांगांमधील खुर्च्यांचं तिकीट साडे तीन हजारावरुन चार हजार रुपयांवर झालंय.

LATEST VIDEOS

LiveTV