पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अधिसभेची आज निवडणूक

19 Nov 2017 03:57 PM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणूकीसाठी आज मतदान होतं आहे. विद्यापीठ एकता पॅनलकडून मुख्यमंत्र्यांचे चुलतबंधु प्रसेनजित फडणवीस पदवीधर मतदारसंघातुन निवडणूक लढवत आहेत.
संस्थाचालकांमधुन दहा आणि पदवीधर मतदार संघातून दहा सदस्य अधिसभेवर निवडले जाणार आहेत. याआधी संस्थाचालकांच्या दहा पैकी एका जागेवर विद्यापीठ प्रगती पॅनलच्या उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची बीनविरोध निवड झाली.
पुणे, अहमदनगर आणि नाशिक अशा तीन जिल्ह्यांमधे कार्यक्षेत्र असलेल्या या विद्यापीठाचे 49 हजार पदवीधर मतदार आहेत. तर संस्थाचालकांचे 229 मतदार आहेत. तीन जिल्ह्यांमधे मिळुन 58 मतदान केंद्रांवर या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV