पुणे : उद्यापासून सवाई गंर्धव भीमसेन महोत्सवाला सुरुवात

12 Dec 2017 11:42 PM


स्वर्गीय सुरात चिंब होण्यासाठी आतूर झालेल्या कानसेनांची प्रतीक्ष उद्या संपणारय...कारण उद्यापासून पंडित भीमसेन जोशी सवाई गंधर्व महोत्सवाची सूरमयी तार छेडली जाणार आहे.. दुपारी 3 वाजता मधुकर धुमाळ यांच्या अविट गोडीच्या सनई वादनाने महोत्वसाचं पहिलं पुष्प विणलं जाईल.. यंदाच्या महोत्सवात पहिल्या आणि चौथ्या दिवशी दुपारी तीन ते रात्री दहावाजेपर्यंत सुराची बरसात अऩुभवायला मिळणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाची सूरमाळ चार ते रात्री दहापर्यंत विणली जाणारय. शेवटच्या दिवशी म्हणजे 17 डिसेंबरला पावणेबारा ते रात्री दहापर्यंत सांगीतिक मैफिल रसिकांना तृप्त करून महोत्सवाचं सूप वाजेल.

LATEST VIDEOS

LiveTV