पुणे : एसटी चालकाला शिवीगाळ आणि पट्ट्यानं मारहाण, विजय शिवतारेंकडून चालकाची सुटका

28 Oct 2017 02:15 PM

पुण्यातील खराडी बायपास चौकात एसटी बसचालकास शिवीगाळ करून पट्ट्यानं मारहाण केल्याची धक्कादायक घटना काल दुपारी घडली.

मात्र या वादात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सतर्कता दाखवली आणि आपल्या गाडीतून उतरुन वाद सोडवला. तसंच पोलिसाशी संपर्क साधून चालक आणि वाहकाला मारहाण करणाऱ्या दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एसटी चालक संदीप अशोक पवार यांनी तक्रार दिली. त्यानुसार सुमित नारायण फलके याला अटक करण्यात आलीय. तर एक जण फरार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV