पुणे : फडणवीस सरकारच्या तीन वर्षातील कारभाराची सुप्रिया सुळेंकडून चिरफाड

01 Nov 2017 10:54 AM

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या 3 वर्षांच्या कारभाराची चिरफाड केली. फसलेली कर्जमाफी, दिखाऊ स्वस्छ भारत योजना, स्मार्टसिटी योजनेचा उडालेला बोजवारा आणि निधीअभावी रखडलेली संसद दत्तक ग्राम योजना अशा शब्दात टीका करत सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला. पुण्यात त्या पत्रकारांशी बोलत होत्या. राज्य सरकारमधून शिवसेना बाहेर पडल्यास भाजपला पाठिंबा देण्याबाबत आणि 2019 च्या निवडणुका राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली लढण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

LATEST VIDEOS

LiveTV