पुणे : खासदार सुप्रिया सुळेंचा 'सेल्फी विथ खड्डे'

01 Nov 2017 01:30 PM

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी खड्ड्यांसोबतचे सेल्फी आपल्या ट्विटर अकाऊंटवर अपलोड केले आहेत. सुप्रिया सुळेंनी कात्रज-उंद्री बायपास आणि बोपदेव घाटातील खड्ड्यांचा फोटो काढले. कालच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्राचं आश्वासन दिलं होतं. आणि म्हणूनच खड्ड्यांची माहिती देण्यासाठी सुप्रिया सुळेंनी खडड्यांसोबत सेल्फी काढला. तसंच रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो लोकांनी काढावेत आणि मला आणि चंद्रकांत पाटलांना त्यात टॅग करावं असं आवाहनही त्यांनी केलं.

LATEST VIDEOS

LiveTV