पुणे : दिग्दर्शक सतीश आळेकरांना यंदाचा तन्वीर पुरस्कार

02 Dec 2017 10:09 PM

नाट्यक्षेत्रातील मानाचा तन्वीर पुरस्कार यंदा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश आळेकरांना दिला जाणार आहे...आळेकरांच्या महानिर्वाण, मिकी आणि मेमसाहेब, महापूर, बेगम-बर्वे अशा अनेक नाटकांनी मराठी प्रायोगिक रंगभूमीवर नवीन प्रवाह निर्माण केला. त्यांच्या ब्लॅक ह्युमर आणि अबसरडीटी या नाटकांनी माध्यमवर्गीयांच जगणं रंगमंचावर उभं केलं. पुणे विद्यापीठातील नाट्यविषयक अभ्यासक्रमाची बांधणी आणि ललित कला केंद्राच्या स्थापनेमध्ये आळेकरांचं महत्वाचं योगदान आहे. संगीत नाटक अकादमी, पद्मश्री असे अनेक महत्वाचे सन्मान त्यांना मिळाले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV