पुणे : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट, लग्नातून 17 तोळे सोनं लंपास

20 Dec 2017 05:24 PM

पुण्यामध्ये चोरांचा अक्षरश सुळसुळाट पहायला मिळतोय...२ डिसेंबरला डीपी रोडवर एका लग्नातून चोरट्यांनी चक्क १७ तोळे सोनं लुटलंय...ही सगळी घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली आहे.
कोणाला संशय येऊ नये म्हणून चोर लग्नात कोट घालून आले, त्यानंतर सोनं असलेल्या पर्सवर त्यांनी कोट ठेवला आणि कोणाचं लक्ष नाहीये हे कळताच पर्स घेऊन पसार झाले...घटनेच्या दिवशी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला...आता सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस पुढील तपास करत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV