पुणे : शिवाजी सावंतांच्या कादंबरी स्वामित्व हक्क वादावर पडदा, सर्व हक्क 'कॉन्टिनेन्टल'कडे

02 Dec 2017 10:03 PM

दिवंगत साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय, छावा आणि युगंधर या कादंबऱ्यांच्या स्वामित्त्व हक्क वादावर अखेर पडदा पडलाय. या पुस्तकांचे मराठी प्रकाशनाचे सर्व अधिकार कॉन्टिनेन्टलकडेच कायम राहतील असं असा निर्णय सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या मंडळानं दिलाय. मृत्युंजय, छावा आणि युगंधर या कादंबरींचे हक्क कॉन्टिनेन्टल प्रकाशनाकडे होते. सावंत यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी या पुस्तकांचे हक्क मेहता पब्लिशिंग हाउस या प्रकाशन संस्थेकडे दिले. तीन पुस्तकांचे हक्क मेहतांकडे गेल्यानंतर कॉन्टिनेन्टलकडूनही पुस्तकांची विक्री सुरू होती. त्यावरून दोन प्रकाशकांची सुमारे चार वर्षे न्यायालयीन लढाई सुरू होती. या निकालामुळे आता पूर्ण हक्क ‘कॉन्टिनेन्टल’ला मिळाले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV