स्पेशल रिपोर्ट : पुणे : महाराष्ट्र केसरीसाठी दोस्तीत कुस्ती, सख्खे मित्र फायनलमध्ये भिडणार

24 Dec 2017 04:42 PM

पुणे शहरचा अभिजीत कटके की, साताऱ्याचा किरण भगत? कोण होणार 2017 सालचा महाराष्ट्र केसरी? उभ्या महाराष्ट्रातल्या लाखो कुस्तीशौकिनांना सध्या याच प्रश्नाच्या उत्तराची उत्सुकता लागून राहिलीय.

पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भूगावात आज सायंकाळी त्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. पण तोवर महाराष्ट्राच्या गावागावात महाराष्ट्र केसरीचाच विषय चवीचवीनं चघळला जाईल. आपणही त्या निमित्तानं अभिजीत कटके आणि किरण भगत या दोन्ही पैलवानांच्या ताकदीचं मूल्यमापन करुया.

अभिजीत कटके आणि किरण भगत हे दोघंही एकाच वयाचे म्हणजे बावीस वर्षांचे आहेत. पण या वयातही त्या दोघांनीही महाराष्ट्राच्या कुस्तीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV