स्पेशल रिपोर्ट : पुणे : कोण होणार 2017 चा महाराष्ट्र केसरी?

19 Dec 2017 09:06 PM

महाराष्ट्राच्या कुस्तीत सर्वात प्रतिष्ठेच्या अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला उद्यापासून पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भूगावात सुरुवात होत आहे. चाळीसगावच्या विजय चौधरी गेली तीन वर्षे सातत्यानं महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. पण सध्या डीवायएसपीच्या ट्रेनिंगमध्ये व्यस्त असल्यानं विजय यंदा महाराष्ट्र केसरीत खेळू शकणार नाही. मग विजय चौधरीच्या अनुपस्थितीत महाराष्ट्र केसरी किताबाचा मान कोण मिळवणार? पाहा एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवींचा रिपोर्ट. 

LATEST VIDEOS

LiveTV