पंजाब : भटिंडामध्ये धुक्यामुळे अपघात, डंपरने 10 विद्यार्थ्यांना चिरडंल

09 Nov 2017 08:42 AM

पंजाबच्या भटिंड्यात बुधवारी सकाळी धुरक्यामुळे झालेल्या गाड्यांच्या अपघातात 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अपघातावेळी कॉलेजचे विद्यार्थी बसची वाट पाहत होते. त्याचवेळी डंपरने त्यांना चिरडलं. यात विद्यार्थ्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर 17 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच 6 अॅम्ब्युलन्स घटनास्थळी झाल्या. 11 जखमींना खासगी रुग्णालयात तर 5 जणांना भटिंडा सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV