गुजरात : गुजराती भाषा न कळल्यामुळे राहुल गांधी चुकून लेडीज टॉयलेटमध्ये गेले!

12 Oct 2017 09:09 PM

गुजराती भाषा न समजल्यामुळं काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींची मोठी फसगत झाली. गुजरातीत लिहिलेला फलक न वाचता आल्यामुळं राहुल गांधी चुकून महिलांच्या प्रसाधनगृहात शिरल्याचा दावा एका वेबसाईटसनं केला आहे. राहुल गांधी लेडीज टॉयलेटमध्ये गेल्यानंतर प्रचंड गर्दी जमली. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी गर्दी हटवली. मात्र राहुल गांधींना लेडीज टॉयलेटमधून बाहेर पडताना पाहून सर्वांना हसू अनावर झाल्याचं वृत्त प्रसिद्ध कऱणाऱ्या वेबसाईट्सनं दिलं आहे. गुजरात विधानसभेसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होमग्राऊंडवर तळ ठोकून आहेत.छोटा उदयपूरमधल्या सभेनंतर हा सगळा प्रकार घडल्याचं समजतं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV