रायगड : दिवेआगारमधील दरोडा आणि हत्या प्रकरणाचा आज अंतिम निकाल

16 Oct 2017 05:42 PM

रायगड जिल्ह्याचं वैभव असलेल्या दिवेआगर येथील सुवर्ण गणपती मूर्तीच्या चोरीप्रकरणी आज अंतिम निकाल येणार आहे.  या प्रकरणात १० आरोपींवर आरोप निश्चित केले आहेत. तर दोघांची निर्दोष सुटका केली गेली. आज अलिबाग येथील विशेष न्यायालय या प्रकरणाचा अंतिम निकाल देईल.  23 मार्च 2012 च्या रात्री सुवर्ण गणेश मंदिरात दरोडा पडला होता. सुवर्ण गणेशाची मूर्ती चोरुन मंदिरातल्या दोन्ही सुरक्षारक्षकांची दरोडेखोरांनी हत्या केली होती. त्यामुळे आज या प्रकरणात काय निकाल येतो, हे पाहणं महत्वाचं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV