मुंबई : नाना पाटेकरांनी माहिती नसताना उगाच चोंबडेपणा करु नये : राज ठाकरे

04 Nov 2017 09:27 PM

नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करु नये, ज्या विषयाची माहिती आहे त्याबद्दल बोलावं अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अभिनेते नाना पाटेकरांच्या फेरीवाल्यासंबंधी वक्तव्याचा समाचार घेतला. मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

महात्मा नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांबद्दल काहीतरी वक्तव्य केलं. नानाला वाटतं तो चंद्रावरुन पडलाय, जेव्हा मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नव्हती तेव्हा नाना पाटेकर बोलले नाही, तेव्हा मनसेने लढा दिला असं म्हणत राज ठाकरेंनी नानाची मिमिक्रीही केली.

LATEST VIDEOS

LiveTV