नवी दिल्ली : काँग्रेस खासदारांच्या गोंधळामुळे राज्यसभेत सचिनच्या भाषणात व्यत्यय

21 Dec 2017 03:15 PM

खासदार सचिन तेंडुलकर आज राज्यसभेत उपस्थित होता. ‘राईट टू प्ले’ या विषयावर सचिन आपलं आज मत मांडणार होता, मात्र विरोधकांच्या गदारोळात सचिनला बोलण्याची संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे खासदार झाल्यापासून सचिन पहिल्यांदाच राज्यसभेत बोलणार होता.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर राज्यसभेचा खासदार आहे. सचिन खूप दिवसांनंतर राज्यसभेत बोलणार होता. ‘राईट टू प्ले’ असा त्याचा विषय होता. त्यामुळे सचिन काय बोलणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती.

LATEST VIDEOS

LiveTV