नाशिक : पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडला!

23 Oct 2017 01:30 PM

नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात बिबट्याची दहशत अजूनही कायम आहे. काल रात्री पाण्याच्या शोधात निघालेला बिबट्या रात्रीच्या सुमारास विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. रामतीर येथील शेतकरी देविदास आहिरे यांच्या शेतातल्या विहिरीत हा बिबट्या रात्री पडला. सकाळी आहिरे विद्युत पंप सुरु करण्यासाठी शेतात गेले असता त्यांना बिबट्याचा आवाज आला. त्यांनी त्याची माहिती वनविभागाला कळवली आणि अखेर वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बाहेर काढलं.

LATEST VIDEOS

LiveTV