रत्नागिरी : शिवारआंबरे गावातील विहिरीत बिबट्या पडला, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु

11 Nov 2017 10:27 PM

रत्नागिरीच्या शिवारआंबरे गावातील एका विहिरीत बिबट्या पडल्यानं एकच खळबळ उडाली. गावामधील लाखण वाडीच्या विहिरीतील पाणी पंपाद्वारे वर येत नव्हते. त्यामुळं पाणी का येत नाही हे बघण्यासाठी गावकरी विहिरीवर गेले असता एक बिबट्या विहिरीच्या आत सोडलेल्या पंपावर बसलेला आढळून आला. विहिरीत पडलेला हा बिबट्या बाहेर पाडण्यासाठी जिवाच्या आकांताने डरकाळ्या फोडत होता. पाण्याबाहेर पडण्याच्या प्रयत्नात या बिबट्यानं पंपाचे नुकसान करण्यास सुरवात केल्यानं लोकांनी पंप विहिरीबाहेर काढला. त्यामुळं आधार शोधण्यासाठी हा बिबट्या विहिरीतील कपारीत जाऊन बसला. अखेर वन विभागाचे अधिकारी येताच त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा विहिरीत सोडला. 

LATEST VIDEOS

LiveTV