रत्नागिरी : दत्तजयंतीला भाटीमिऱ्या गावात नारळ लढवण्याची स्पर्धा

05 Dec 2017 12:00 AM

रत्नागिरीजवळच्या एका गावात नारळांच्या लढाईची एक अनोखी परंपरा आहे. भाटीमिऱ्या गावात दत्त जयंतीच्या दिवशी ही नारळ लढवायची जणू स्पर्धाच सुरु असते. यामध्ये दोन व्यक्ती आपापले नारळ घेऊन एकमेकांसमोर उभे ठाकतात. एकमेकांचे नारळ एकमेकांवर आपटले जातात, ज्याचा नारळ फुटतो तो बाद होतो. ज्याने नारळ फोडला त्याला तो फुटलेला नारळ दिला जातो.  या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोकण किनारपट्टीतील अनेक भागातून खेळाडू खास मिऱ्या गावात येतात

LATEST VIDEOS

LiveTV