सिंधुदुर्ग : कोकण किनाऱ्यावर 'ओखी' चक्रीवादळाचा परिणाम, समुद्र किनारी रात्रभर लाटांचं तांडव

04 Dec 2017 08:33 AM

सिंधुदुर्गातही ओखी वादळाचा परिणाम पाहायला मिळतो आहे. मालवण, वेंगुर्ले, देवगड समुद्रीकिनाऱ्यावर तडाखा बसला. कोचरा-देवबागला समुद्राचे पाणी वस्तीत घुसले. किनाऱ्यावरील मच्छिमार बांधव आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर मालवण तालुक्यातील आचरा, मेढा, दांडी, किनारपट्टीलाही समुद्राच्या उधणाचा तडाखा बसला आहे. पिरावाडी गावाशी संपर्क तुटलाय तर देवबागमध्ये कुर्लेवाडीत पाणी घुसलं. 

LATEST VIDEOS

LiveTV