रत्नागिरी : ओखी चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला धोका

02 Dec 2017 03:06 PM

ओखी चक्रीवादळामुळे केरळ आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घातला असताना इकडं महाराष्ट्रातही त्यामुळे चिंता आहे. कारण ओखी वादळाचा फटका दक्षिण गुजरात आणि उत्तर कोकणाला बसण्याची भीती स्कायमेटने व्यक्त केली आहे.
ओखी वादळामुळे महाराष्ट्राच्या किनाऱ्यांवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पाच ते आठ डिसेंबरदरम्यान काही भागात पावसाची शक्यता आहे. ओखी चक्रीवादळाच्या धोक्यानंतर रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन देसाई यांनी 

LATEST VIDEOS

LiveTV