रत्नागिरीच्या समुद्रकिनारी आढळला अत्यंत विषारी मासा

13 Oct 2017 08:54 PM

रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर आज सकाळी विचित्र आकाराच्या माशानं लोकांचं लक्ष वेधून घेतलं. अत्यंत विषारी असलेल्या या माशाला सुदैवाने कुणीही स्पर्श केला नाही. त्यामुळे अनर्थ टळला. काटेरी आणि बेढब मासा किनाऱ्याला लागल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि त्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली.
आम्ही जेव्हा या माशाबाबतची माहिती घेतली, तेव्हा हा मासा अत्यंत विषारी असून, त्याचा काटा लागल्यास माणसाला गंभीर इजा होऊ शकते. कारण या माशातून बाहेर पडणारे द्रव हे सायनाईडपेक्षा 1 हजार 200 पट विषारी असते. असं असलं तरी जपानमध्ये हा मासा खाल्ला जातो. पण हा मासा खाल्ल्याने एका वर्षात जपानमध्ये मरणाऱ्यांची संख्या 100 पर्यंत पोहोचते.

LATEST VIDEOS

LiveTV