रत्नागिरी : कोकणात ओखी वादळाची चाहुल, समुद्रकिनारी उंच लाटा

04 Dec 2017 10:39 AM

मुंबईसह कोकणच्या समुद्र किनाऱ्यांनी रौद्ररुप धारण केल्याने लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह अनेक ठिकाणी काल रात्री मोठ्या लाटा उसळल्या. मात्र पाण्याची वाढलेली पातळी ही उधाणामुळे होती की ओखी वादळामुळे यावरुन कोकणात संभ्रम निर्माण झाला आहे.  सिंधुदुर्गात प्रामुख्याने मालवण, वेंगुर्ले, देवगड किनाऱ्याला या लाटांचा तडाखा बसला आहे. तर रत्नागिरी किनाऱ्यालगतच्या अनेक गावांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी सचिन देसाई यांचा रिपोर्ट

LATEST VIDEOS

LiveTV