मुंबई : बेस्टची प्रस्तावित भाडेवाढ मागे न घेतल्यास आंदोलन करु : सचिन अहिर

15 Nov 2017 08:48 PM

आर्थिक गर्तेत असलेल्या बेस्टला तारण्याकरता प्रवाशांच्या खिशालाच हात घालण्यात येणार आहे. काऱण बेस्ट प्रशासनानं बस तिकीट आणि पास दरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला. बसभाडे आणि पास दरवाढीला काल बेस्ट समितीकडून मंजुरी देण्यात आली. त्यामुळे बेस्ट तिकिटाकरिता एक ते १२ रुपये आणि मासिक पासासाठी ४० ते ३५० रुपये  जास्त मोजावे लागणार आहेत. तिकीट आणि पासांतील वाढ ही सहा आणि त्यापुढील किलोमीटर अंतरासाठी लागू होईल. अर्थात मुंबई पालिकेच्या अंतिम मंजुरीनंतरच बेस्ट भाडेवाढ लागू होईल, असे बेस्ट समितीकडून स्पष्ट करण्यात आलं.
दरम्यान बेस्टची प्रस्तावित दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा राष्ट्रवादी नेते सचिन अहिर यांनी दिला.

LATEST VIDEOS

LiveTV