मुंबई : इन्फोसिसच्या सीईओपदी सलील एस.पारेख यांची नियुक्ती

02 Dec 2017 11:24 PM

जगविख्यात आयटी कंपनी इन्फोसिसच्या सीईओपदी सलील एस. पारेख यांची नियुक्ती करण्यात आलीय. सीईओशिवाय कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरपदाची धुराही पारेख यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलीय. 2 जानेवारीपासून सलील पारेख पदभार स्वीकारणार आहेत. पारेख हे मुळची फ्रान्सची असणारी आणि भारतात बऱ्यापैकी विस्तारलेल्या कॅपजेमिनी कंपनीच्या कार्यकारी बोर्डाचे सदस्य आहेत. त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापिठातून कंप्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये मास्टर्सची पदवी घेतली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV