सांगली: 14 पोलिसांच्या तडकाफडकी बदल्या

16 Dec 2017 05:09 PM

अनिकेत कोथळे हत्येमुळं सांगली पोलिसांची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी जिल्ह्यातल्या १४ पोलिसांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.. सांगलीचे पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी हे पाऊल उचललं आहे...त्यामुळं सांगली पोलिसांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे...दरम्यान यानंतरही काही बदल्या होऊ शकतात अशी भिती अनेक पोलिसांना आहे...अनिकेत कोथळेचा पोलीसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता...ही हत्या लपवण्यासाठी पोलिसांकडून बरेच प्रयत्न झाले होते..त्यामुळं सांगली पोलीसांची प्रतिमा मलीन झाली होती...

LATEST VIDEOS

LiveTV