सांगली : अनिकेतच्या हत्या प्रकरणातील कामटेसह 6 जणांची कोठडी आज संपणार

21 Nov 2017 01:27 PM

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणातील आरोपी युवराज कामटेसह सहा जणांच्या पोलीस कोठडीची आज मुदत संपणार आहे. आज दुपारी सांगली कोर्टात आरोपींना हजर केलं जाणार आहे. तपास अजून अपूर्ण असल्यानं आणखी तीन दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सीआयडी न्यायालयाकडे करणार आहे. अनिकेतचा मृतदेह नेलेल्या खासगी दवाखान्यातील फुटेज सीआयडीनं ताब्यात घेतलं आहे. सोबतच तिथल्या डॉक्टरांचा जबाबही नोंदवला. हत्येच्या रात्री कामटेंनी वरीष्ठ अधिकाऱ्यांशी केलेल्या कॉल्सची माहितीही सीआयडीनं मागवली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV