सांगली : दोषींवर कारवाई न झाल्यास अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा

12 Nov 2017 07:36 PM

सांगलीतल्या अनिकेत कोथळेंच्या हत्येप्रकरणी गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी कोथळे कुटुंबाची भेट घेतली. आरोपींवर योग्य कारवाई न झाल्यास संपूर्ण कुटुंब आत्मदहन करु असा इशारा कोथळे कुटुंबियांनी दिला. पैशांसाठी दमदाटीच्या आरोपात पोलिसांनी अनिकेतला अटक केली होती. त्यानंतर कोठडीत बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली. आणि मृतदेह जाळून परस्पर विल्हेवाटही लावून टाकली. याप्रकरणात आतापर्यंत पोलीस उपनिरीक्षकासह 12 पोलीस निलंबित केले गेले आहेत. ज्या सेक्स रॅकेटमुळे अनिकेतची हत्या केल्याचं बोललं जातं आहे, त्या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं गेलं असून त्यांची चौकशी होणार आहे. सांगलीतल्या लकी बँग हाऊसमध्ये अनिकेत कामाला होता. त्याठिकाणी बनवल्या जाणाऱ्या अश्लिल सीडींचा सुगावा अनिकेतला लागल्यानं त्याची हत्या केली गेली, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला.

LATEST VIDEOS

LiveTV