सांगली : कृष्णेच्या पात्रात पुन्हा एकदा मगरींचं दर्शन

26 Oct 2017 08:42 PM

सांगली शहरालगत जाणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पुन्हा एकदा मगरींचे दर्शन झाले आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे...
विशेषतः सकाळच्या सत्रामध्ये मगरी निवांतपणे विहार करताना दिसत आहेत.. आज सकाळी काही लोक पोहण्यासाठी नदीत उतरले होते... त्याचवेळी बोटिंगचा सराव करणाऱ्या काही मुलांना या मगरी दिसल्या... त्यामुळे त्यांनी पोहणाऱ्या लोकांना सतर्क केलं... मगर असल्याची माहिती ऐकून सगळे जण बाहेर आले... त्यामुळे मोठा अनर्थ टळला...
स्थानिक लोकांनी या मगरींना पकडून त्यांचे स्थलांतर करण्याची मागणी वनमंत्र्यांकडे केली होती... त्यानंतर मगरींना पकडण्याचे आदेशही सुटले होते... पण अंमलबजावणी मात्र झाली नाही...

LATEST VIDEOS

LiveTV