सांगली : लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यतेसाठी लिंगायत समाजाचा महामोर्चा

03 Dec 2017 07:42 PM

सांगलीत आज लिंगायत समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी महामोर्चा काढण्यात आला. लिंगायत धर्माला संवैधानिक स्वतंत्र मान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा हवाय तसंच राज्यातील लिंगायत धर्मातील सर्व पोटजातींना ओबीसीचं आरक्षण मिळावं यासह अनेक मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नांदेड, लातूर, बेळगाव, हुबळीनंतर सांगलीतल्या महामोर्चासाठी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील लिंगायत बांधव रस्त्यावर उतरले होते.
विश्रामबाग चौकात लिंगायत समाजाच्या याच महामोर्चाचं रुपांतर सभेत झालं. मोर्चाचं नेतृत्व राष्ट्रसंत जगद्गुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांनी केलं. यावेळी देशभरातून जगद्गुरू, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, लिंगायत बांधव सहभागी झाले होते.

LATEST VIDEOS

LiveTV