स्पेशल रिपोर्ट : सांगलीत परप्रांतीय कामगारांना मनसैनिकांची मारहाण

11 Oct 2017 09:15 PM

सांगलीतल्या मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय कामगारांना काल तुफान मारहाण केली. आता या अशा मारहाणीचं कारणही जाणून घ्या. सांगलीच्या कुपवाडमध्ये एमआयडीसी आहे. त्यात शेकडो उद्योग आहेत. पण उद्योजक फक्त परप्रांतियांनाच रोजगार देतात आणि त्यामुळे स्थानिकांवर अन्याय होत असल्याचा दाव मनसेचा आहे.
इतकंच नाही, तर परप्रांतियांमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचाही दावा लोक करत आहेत.
पक्षस्थापनेनंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांचा मुद्दा घेऊन मनसेला मुंबई-पुण्यात रुजवलं. आता तब्बल 8 वर्षांनी पुन्हा एकदा परप्रांतियांविरोधातली अशीच ठिणगी पडली आहे. फक्त ती व्यापक रुप धारण करते. मनसेची राडा स्टाईल पुन्हा सुरु होती, की हे आंदोलन अल्पजीवी ठरते, यावर बरंच काही अवलंबून असेल.

LATEST VIDEOS

LiveTV