सांगली : ...नाहीतर मी ‘मातोश्री’वरील अनेक गुपित बाहेर काढेन : नारायण राणे

09 Dec 2017 09:30 PM

पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

उद्धव यांनी माझ्यावर काहीही आरोप करु नयेत, त्यांनी आपलं तोंड बंद ठेवावं अन्यथा ‘मातोश्री’वरील सर्व घटना आणि गुपितं आपण बाहेर काढू. असा इशारा राणेंनी दिला आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलतं होते.

'उद्धव ठाकरे यांनी माझ्या विरोधातील षडयंत्र थांबवावीत नाहीतर उद्धवने 'मातोश्री'वर बाळासाहेबांना कसा त्रास दिला हे मी उघड करेन.' असंही राणे यावेळी म्हणाले.

'बाळासाहेबांना कोणत्याही प्रकारचे दु:ख मी दिलं नाही. याउलट ‘मातोश्री’वर त्या काळात काय-काय घडलं हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बाळासाहेबांना प्रचंड त्रास दिला.' असा गंभीर आरोपही राणेंनी यावेळी केला.

राणेंच्या या आरोपानंतर आम्ही शिवसेनेच्या अनेक नेत्यांशी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला. मात्र, कोणत्याही नेत्यानं त्यासाठी प्रतिसाद दिला नाही.

LATEST VIDEOS

LiveTV