सांगली : 'पद्मावती'ला महाराष्ट्रातही विरोध, शिवप्रतिष्ठानने भन्साळींचा पुतळा जाळला

02 Dec 2017 03:09 PM

पद्मावती चित्रपटाला महाराष्ट्रातही विरोध वाढताना दिसत आहे. आज सांगलीच्या स्टेशन चौकात संजय भन्साळीचा पुतळा श्री शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जाळला. तसंच पद्मावती विरोधात मोर्चाही काढला. हा चित्रपट प्रदर्शित करु नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हा चित्रपट प्रदर्शित केला तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही चित्रपटगृहात तो चालू दिला जाणार नाही असा इशाराही शिवप्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV