सांगली : अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी सांगलीच्या पोलिस अधीक्षकांची नागपूरला बदली

23 Nov 2017 06:03 PM

सांगली शहर पोलिस ठाण्यात पोलिसांच्या 'थर्ड डिग्री'त मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे प्रकरणात, सांगलीचे पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांची अखेर बदली करण्यात आलीय. शिंदे यांची नागपूरच्या राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशक पदी नेमणूक करण्यात आलीय. शिंदे यांच्या जागी सांगलीच्या पोलिस अधिक्षक पदी सुहैल शर्मा यांना पाचारण करण्यात आलंय. तसच उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाळी काळे यांचीही बदली झालीय त्यांना सोलापूर शहरला सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, या प्रकरणी यापुर्वीच पोलिस निरिक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांना निलिंबीत करण्यात आल आहे. युवराज कामटे आणि अन्य पोलिस कर्मचा-यांनी अनिकेतचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह अंबोलीत नेत जाळण्याचा प्रयत्न केला होता.

LATEST VIDEOS

LiveTV