सांगली : पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू, पीएसआयसह पाच अटकेत

09 Nov 2017 02:39 PM

सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू झाला आहे. अनिकेत कोथळे या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना दमदाटी, जबरदस्ती करुन पैसे उकळण्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले होतं. यातील अनिकेत कोथळेवर पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापरल्यामुळे, त्याचा मृत्यू झाल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

LATEST VIDEOS

LiveTV