सांगली: अनिकेत कोथळे हत्या: तृप्ती देसाईंचं आंदोलन

14 Nov 2017 07:48 PM

अनिकेत कोथळेच्या हत्येसाठी जबाबदार पोलिसांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत अनिकेतच्या अस्थी न स्वीकारण्याचा निर्णय कोथळे कुटुंबियांनी घेतलाय. त्यामुळं गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी कोथळे कुटुंबियांची समजूत काढण्यासाठी आज पुन्हा त्यांची भेट घेतली. दरम्यान अनिकेत कोथळेंच्या हत्याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना ठिय्या आंदोलनाला बसल्या होत्या..तेव्हा पोलिस आणि तृप्ती देसाईंच्यात वादावादी झाली...त्यानंतर पोलिसांनी तृप्ती देसाईंसह महिला आंदोलकांना ताब्यात घेतलं.

LATEST VIDEOS

LiveTV