मुंबई : आधी सिनेमा बघा, मग विरोध करायचा का ठरवा, संजय पाटलांचं आवाहन

17 Nov 2017 08:51 PM


उच्च न्यायालयानं दशक्रिया चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केल्यानंतरही विरोधक आंदोलनावर ठाम आहेत. दशक्रिया चित्रपटाविरोधात पुरोहितांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळून लावलीय. तरी देखील औरंगाबाद, नाशिक, पुणे, बुलडाणा आणि अमरावतीसह राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये दशक्रिया चित्रपटाला विरोध सुरूच आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर पुरोहीत संघानं थिएटर मालक आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दशक्रिया चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केलीय. तर तिकडे पैठणमध्ये सकाळी काहीवेळासाठी दशक्रिया विधी बंद ठेवण्यात आल्या होत्या. बुलडाणा आणि बारामतीमध्ये देखील दशक्रिया चित्रपटाला विरोध कऱण्यात आला.

LATEST VIDEOS

LiveTV